Sunday 16 September 2012

Road safety for peddlers

मी रोज पायी फिरतो. मला असे आढळते कि  बरेच लोक वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळता कसेही वाहन चालवतात . त्यामुळे अपघात होतात व त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या निष्पाप लोकांना भोगावे लागतात .उदा .माझ्या सभोवती आजपर्यंत बरेच जन गाडीने ठोकर दिल्याने मृत्यू पावलेत .१] अवधूत बंगल्यातील श्री .परळकर वय ३७वर्षे . २] आकुर्डी मधील श्री प्रकाश मुत्था वय ५६ वर्षे .३]डॉक्टर सुशील मुत्थियान यांच्या आजी वय ८० च्या आत .४]निशांत  गुगळे वय ३६वर्षे . हि  मोजकी उदाहरणे मी येथे देत आहे .हे सर्व जन येथील स्थानिक रहिवाशी होते . सर्व पुणे व पिंपरी चिंचवड ची  गणती केली तर आकडा खूपच मोठा होईल . बरे हे अपघात करणारे लगेच जामिनावर सुटले .त्यांचेवर न्यायालयात अद्याप खटले चालूच आहेत .त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले तरी त्यांना शिक्षा मात्र फारच कमी होईल . किंवा होणारही नाही .शिवाय त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून मृतांच्या नातेवैकांना व साक्षीदारांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात .तरी देखील त्यांना न्याय मिळेलच असे नाही .याला कारण आपली कायदा रचना .जी गुन्हेगारांनाच जास्तीत जास्त मोकळे सोडते .शिवाय वकील देखील कायदे जास्तीतजास्त वाकवण्यात पटाईत असल्यामुळे खरे अपराधी मोकळे सुटतात .वरील घटनांपैकी एका दुचाकीस्वाराने तर पाच सहा वेळा अपघात केला असून दर वेळी तो जामिनावर लगेच सुटलेला आहे असे म्हणतात .याकरिता वाह्तुकीविषयक सर्व प्रकारचे कायद्यांचे आताचे स्वरूप बदलून ते जास्तीत जास्त कठोर करावेत .उदा .परवाना रद्द करणे .जामिनाची रक्कम वाढविणे वाहन जप्त करणे याबरोबरच अपघातग्रस्तांना तांतडीची मदत देण्यासाठी वाहनचालकाकडून भरीव रक्कम वसूल करणे व अपघात करणाऱ्यावर जास्तीतजास्त जबाबदारी टाकणे इ .असे मला वाटते . मित्रांनो यावर आपले काय मत आहे .


No comments:

Post a Comment