Tuesday 18 September 2012

Road Safety for Peddlers

मित्रांनो १६-०९ला मी पादचारी सुरक्षेबद्दल लिहिल्रे होते .आज आणखी थोडे . मी पुने व पिंपरी चिंचवड भागात जवळजवळ चौकातील सिग्नल्स पहिले .बहुतेक ठिकाणी पादचार्यांसाठी सिग्नल नाहीतच .पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडय्चाच नाही असा त्याचा अर्थ होतो असे मला वाटते. बऱयाच ठिकाणी असे दिसते कि पहिला सिग्नल संपून दुसरा होतांना लोक पळत पळत रस्ता ओलांडतात . यामुळे अपघात होतात .सिग्नल व्यवस्था करतांना फक्त वाहनांचाच विचार केलेला दिसतो .तरी माझे असे ठाम मत आहे कि प्रत्येक चौकात पादचार्यांसाठी सिग्नल पाहिजेच .पुण्यामध्ये राजश्री परमार फौन्डेशन  वाहतूक व्यवस्थेबद्दल बरेच काम करीत आहे माझी त्यांना विनंती आहे कि त्यांनी याबद्दल ठोस काम करावे . तसेच दुचाकी वाहनांना मड फ्ल्याप बसविणे व हेंडलाईट ला मध्यभागी काळा रंग सक्तीचे करणे याचबरोबर वाहनांना फ्याक्टरी फितेद हॉर्नच सक्तीचा असावा त्याव्यतिरिक्त दुसरे हॉर्न वापरण्यास  पूर्ण बंदी असावी .कारण बरेच वाहनचालक मूळचे हॉर्न काढून चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न बसवतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते .शिवाय मोठ्या व अवजड वाहनाचे हेंड लाईट च्या अर्ध्या काचा काळ्या रंगाने सक्तींचे करावे .हे सर्व नियम मोटार वाहन कायद्यात आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही .तरी ती व्हावी व हे नियम मोडल्यास करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत जितकी वाढ करता येईल तितकी करावी .नाहीतरी शासनाकडे सद्ध्या निधी ची कमतरता आहेच .असे केल्यास सरकारचे देखील उत्पन्न वाढेल .आपणास काय वाटते .कळविणे, आभार .    

No comments:

Post a Comment