Wednesday 26 September 2012

what is indepedence?

स्वातंत्र्य म्हणजे काय?  मला असे वाटते कि दुसर्यांना आपला त्रास होणार नाही अशा रीतीने जगणे म्हणजे स्वातंत्र्य होय . यामध्ये मग सर्व आले .रहदारीचे नियम पाळणे .स्वच्छतेचे नियम पाळणे .सार्वजनिक ठिकाणी तसेच आपल्या घरात देखील इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून वर्तन करणे .तसेच ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण यांचे नियम पाळणे  हे व इतर अनेक नियम पाळणे म्हणजे स्वातंत्र्य असे मला वाटते .कळावे . 

Saturday 22 September 2012

What is independence?

स्वातंत्र्य म्हणजे काय?  मला बरेच दिवसांपासून हा प्रश्न सतावतो आहे .मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे कि मला याचा अर्थ समजावून सांगावा , मी खूपच गोंधळात पडलो आहे . आपल्या उत्तराची वाट पाहतो आहे कळावे .

Tuesday 18 September 2012

Road Safety for Peddlers

मित्रांनो १६-०९ला मी पादचारी सुरक्षेबद्दल लिहिल्रे होते .आज आणखी थोडे . मी पुने व पिंपरी चिंचवड भागात जवळजवळ चौकातील सिग्नल्स पहिले .बहुतेक ठिकाणी पादचार्यांसाठी सिग्नल नाहीतच .पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडय्चाच नाही असा त्याचा अर्थ होतो असे मला वाटते. बऱयाच ठिकाणी असे दिसते कि पहिला सिग्नल संपून दुसरा होतांना लोक पळत पळत रस्ता ओलांडतात . यामुळे अपघात होतात .सिग्नल व्यवस्था करतांना फक्त वाहनांचाच विचार केलेला दिसतो .तरी माझे असे ठाम मत आहे कि प्रत्येक चौकात पादचार्यांसाठी सिग्नल पाहिजेच .पुण्यामध्ये राजश्री परमार फौन्डेशन  वाहतूक व्यवस्थेबद्दल बरेच काम करीत आहे माझी त्यांना विनंती आहे कि त्यांनी याबद्दल ठोस काम करावे . तसेच दुचाकी वाहनांना मड फ्ल्याप बसविणे व हेंडलाईट ला मध्यभागी काळा रंग सक्तीचे करणे याचबरोबर वाहनांना फ्याक्टरी फितेद हॉर्नच सक्तीचा असावा त्याव्यतिरिक्त दुसरे हॉर्न वापरण्यास  पूर्ण बंदी असावी .कारण बरेच वाहनचालक मूळचे हॉर्न काढून चित्रविचित्र आवाजाचे हॉर्न बसवतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते .शिवाय मोठ्या व अवजड वाहनाचे हेंड लाईट च्या अर्ध्या काचा काळ्या रंगाने सक्तींचे करावे .हे सर्व नियम मोटार वाहन कायद्यात आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी होतांना दिसत नाही .तरी ती व्हावी व हे नियम मोडल्यास करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत जितकी वाढ करता येईल तितकी करावी .नाहीतरी शासनाकडे सद्ध्या निधी ची कमतरता आहेच .असे केल्यास सरकारचे देखील उत्पन्न वाढेल .आपणास काय वाटते .कळविणे, आभार .    

Sunday 16 September 2012

Road safety for peddlers

मी रोज पायी फिरतो. मला असे आढळते कि  बरेच लोक वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळता कसेही वाहन चालवतात . त्यामुळे अपघात होतात व त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या निष्पाप लोकांना भोगावे लागतात .उदा .माझ्या सभोवती आजपर्यंत बरेच जन गाडीने ठोकर दिल्याने मृत्यू पावलेत .१] अवधूत बंगल्यातील श्री .परळकर वय ३७वर्षे . २] आकुर्डी मधील श्री प्रकाश मुत्था वय ५६ वर्षे .३]डॉक्टर सुशील मुत्थियान यांच्या आजी वय ८० च्या आत .४]निशांत  गुगळे वय ३६वर्षे . हि  मोजकी उदाहरणे मी येथे देत आहे .हे सर्व जन येथील स्थानिक रहिवाशी होते . सर्व पुणे व पिंपरी चिंचवड ची  गणती केली तर आकडा खूपच मोठा होईल . बरे हे अपघात करणारे लगेच जामिनावर सुटले .त्यांचेवर न्यायालयात अद्याप खटले चालूच आहेत .त्यांचेवरील आरोप सिद्ध झाले तरी त्यांना शिक्षा मात्र फारच कमी होईल . किंवा होणारही नाही .शिवाय त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून मृतांच्या नातेवैकांना व साक्षीदारांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात .तरी देखील त्यांना न्याय मिळेलच असे नाही .याला कारण आपली कायदा रचना .जी गुन्हेगारांनाच जास्तीत जास्त मोकळे सोडते .शिवाय वकील देखील कायदे जास्तीतजास्त वाकवण्यात पटाईत असल्यामुळे खरे अपराधी मोकळे सुटतात .वरील घटनांपैकी एका दुचाकीस्वाराने तर पाच सहा वेळा अपघात केला असून दर वेळी तो जामिनावर लगेच सुटलेला आहे असे म्हणतात .याकरिता वाह्तुकीविषयक सर्व प्रकारचे कायद्यांचे आताचे स्वरूप बदलून ते जास्तीत जास्त कठोर करावेत .उदा .परवाना रद्द करणे .जामिनाची रक्कम वाढविणे वाहन जप्त करणे याबरोबरच अपघातग्रस्तांना तांतडीची मदत देण्यासाठी वाहनचालकाकडून भरीव रक्कम वसूल करणे व अपघात करणाऱ्यावर जास्तीतजास्त जबाबदारी टाकणे इ .असे मला वाटते . मित्रांनो यावर आपले काय मत आहे .


Friday 14 September 2012